• FTTH PLANE

जालना जिल्ह्यात भारत नेट प्रोजेक्ट ची कार्यप्रणाली :

गावे स्वयंपूर्ण बनविण्यासाठी भारतनेट हा सरकारचा क्रांतिकारी उपक्रम आहे. आणि ही क्रांती करण्यासाठीची महत्वाची भूमिका CSC निभावत आहे. आणि जालना जिल्ह्यात CSC चे व्हिजन शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी जालना CSC VLE सोसायटी निभावत आहे.

1.मेंटनेस टीम : प्रत्येक तालुक्यासाठी एक मेंटनेस ची टीम आहे ज्यांची जबादारी ही आहे की, जिथे कोठे ऑप्टिकल फायबर ब्रेक होईल ती तातडीने दुरुस्त करने.
2.FTTH टीम :प्रत्येक गावात व घराघरात इंटरनेट कनेक्शन जोडणी चे काम करत आहे.3.तालुका समन्वयक/नेटवर्क कॉर्डिनेटर / ISP VLE ह्या इको सिस्टम द्वारे सर्व कामाचे संचलन केले जात आहे. 4.हेल्पडेस्क :जिल्हास्तरावरील हेल्पडेस्क च्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी व सर्व विभागाचे नियमन केले जात आहे.
जिल्ह्यात भारत नेट प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी जालना CSC VLE सोसायटी ने 900 VLE ची एक टीम तयार केली असून ही टीम आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेत स्वतःच महत्वाचं योगदान देत आहे.

भारत नेट प्रोजेक्ट विषयी :

हिला टप्पा : प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबरद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहचलेली आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत ऑप्टिकल फायबर केबल पोहचलेली आहे. तसेच GPON सिस्टम सुद्धा बसविले आहे. हा टप्पा जालना जिल्ह्यात पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष कालावधी लागला. हे काम BBNL व BSNL ह्यांनी पूर्ण केले.
दुसरा टप्पा : ह्या टप्प्यातील काम आता सुरू झाले असून आता प्रत्येक गावात सरकारी आस्थापनाना इंटरनेट कनेक्शन देणे सुरू झाले आहे.या टप्प्यात महत्वाचे काम म्हणजे ऑप्टिकल फायबर केबल च्या मेंटनेस चे काम सरकार ने CSC ला दिले आहे. आणि जालना जिल्ह्यातील सर्व 789 गावाची जबाबदारी जालना CSC VLE सोसायटी ला दिलेली आहे. गत एक वर्षांपासून सोसायटी टीम ऑप्टिकल फायबर केबल च्या दुरुस्तीचे काम करत असून आतापर्यंत अनेक गावे रिस्टोअर केलेली आहेत.ह्या टप्प्यात आणखी महत्वाचे काम सुरू होत आहे ते म्हणजे प्रत्येक गावात 5 सरकारी आस्थापनाना गावातील VLE च्या माध्यमातून मोफत कनेक्शन देणे सुरू झाले आहेत.हे करण्यासाठी सरकारच्या एका आदेशानुसार पंचायत कार्यालयातील GPON सिस्टम CSC सेंटर मध्ये शिपटींग करने सुरू झाले आहे.शिपटींग करण्याचे मुख्य कारण हे आहे की या टप्प्यात व तिसऱ्या टप्प्यात इंटरनेट सेवा ज्या तिव्रगतीने प्रत्येक घरात पोहोच करण्याचा जो शासनाचा उद्देश आहे तो सफल करण्यासाठी शिपटींग अनिवार्य आहे.
तिसरा टप्पा : हा टप्पा ही लवकरच सुरू होत असून ह्या टप्प्यात प्रत्येक गावात 100 मीटर अंतरावर सरकार एक वायफाय हॉटस्पॉट स्थापित करणार आहे. ज्याद्वारे गावातील प्रत्येक नागरिक याद्वारे इंटरनेट वापरू शकेल. शिवाय हायस्पीड इंटरनेट वापराचा फायदा घेऊ शकेल.सोबतच व्हाईस कॉल व TV सुद्धा नागरिक इंटरनेट च्या माध्यमातून पाहू शकतील.इंटरनेट ची व्यवस्था एकदा गावात सूर झाली की, गावं हे खऱ्या अर्थाने डिजिटल बनेल आणि सरकार व जगाशी जोडल्या जाईल.या टप्प्यात पुढील ऑनलाइन उपक्रम गावात सुरू होतील.1.ग्रामपंचायतीचे सर्व काम व व्यवहार ऑनलाइन होतील.2.गावपातळीवर हॉस्पिटल उभारले जातील आणि इ टेलिमेडिसीन द्वारे नागरिकांच्या आरोग्याचा काळजी घेतली जाईल.3.जागतिक दर्जाचे शिक्षण इंटरनेटमुळे गावातच मिळू शकेल व ग्रामीण भागातील प्रतिभावंत मुलांना प्रभावी शिक्षण मिळेल.4.बँक,इंशोरन्स इत्यादीं सेवा गावातच मिळतील.त्यासाठी शहरात जाण्याची आवश्यकता राहणार नाही.5.शेती साठी तर इंटरनेट एक वरदान सिद्ध होईल कारण खते,बियाणे,कीटकनाशके ऑनलाइन बुकिंग द्वारे थेट दारात मिळतील शिवाय शेतीविषयक शिबिरे ही इंटरनेट च्या माध्यमातून होईल. तसेच शेतीमाल विक्री सुद्धा घरबसल्या करता येईल.

Show Support!